विटा नगरपालिकेच्या प्रशासनास सहकार्य करा : नगराध्यक्षा प्रतिभा पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, June 3, 2020

विटा नगरपालिकेच्या प्रशासनास सहकार्य करा : नगराध्यक्षा प्रतिभा पाटील


विटा नगरपालिकेच्या प्रशासनास सहकार्य करा : नगराध्यक्षा प्रतिभा पाटील
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : विटा शहरामध्ये सध्या कोरोना बाधित एकही रुग्ण नाही जवळपास 3 महिन्यापेक्षा जास्त आपण शासनाने दिलेल्या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले आहे. पुढे ही आपण करणार आहोत. विटा शहराच्या सुरक्षिततेसाठी आपण अनेक पाऊले उचललेली आहेत. शहरात स्वच्छतेचा दर्जा कायम ठेवलेला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे औषध घराघरापर्यत पोहचवले आहे. कोरोना संकटात मदतीचा हात गोरगरीबांना देण्यात आपण विटेकर कधीच मागे हाटलो नाही. सध्याचा काळ कठीण आहे. आपण सतर्कता ठेवणे व शासनास सहकार्य करणे हाच खबरदारीचा उपाय आहे. पालिका प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तरी आपण सर्वांनी काळजी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Advertise