Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर (साळसिंग मळा) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी





आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर (साळसिंग मळा) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर (साळसिंग मळा) परीसरामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर (साळसिंग मळा) येथील (100 मीटर) 1) विठ्ठलापूर गावाचे उत्तर - सुखदेव नामा बाड यांची शेतजमीन (गट नं. 851) 2) विठ्ठलापूर गावाचे दक्षिण - सुखदेव नामा बाड यांचे घर (गट नं 851) 3) विठ्ठलापूर गावाचे पूर्व - बापू शंकर बाड यांची शेतजमीन (गट नं. 852) 4) विठ्ठलापूर गावाचे पश्चिम - नितीन गोविंद बाड यांचे घर (गट नं. 841).
बफर झोन (1000 मीटर) पुढीलप्रमाणे - 1) विठ्ठलापूर गावाचे उत्तर - माणगंगा नदीपात्र 2) विठ्ठलापूर गावाचे दक्षिण - महादेव दादा बाड यांचे घर (गट नं. 815) 3) विठ्ठलापूर गावाचे पूर्व - बापू संदिपान बाड यांचे घर (गट नं. 883) 4) विठ्ठलापूर गावाचे पश्चिम - भागवत अमृता बाड यांचे घर (गट नं. 820).
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies