शहर स्वच्छता हा विटेकरांचा संस्कार : अतुल पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, June 27, 2020

शहर स्वच्छता हा विटेकरांचा संस्कार : अतुल पाटील

शहर स्वच्छता हा विटेकरांचा संस्कार : अतुल पाटील  
 माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ते २०२० या कालखंडात देशपातळीवर अव्वल स्थान मिळवले आणि शहर स्वच्छतेत ते मानाचे सन्मानाचे स्थान स्वच्छतेतील सातत्याने अबाधित ठेवले. विटा शहराचे माजी नगराध्यक्ष ॲड वैभवदादा पाटील, नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी,  मुख्याधिकारी अतुल पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, तसेच नपा अधिकारी, नपा कर्मचारी यांनी शहर स्वच्छतेचा प्राधान्यक्रम कायम ठेवत शहरात स्वच्छतेतून अमुलाग्रह बदल केला आहे.
सध्या कोरोना विषाणूशी आपण धैर्याने लढा देत आहोत. यामध्ये शहरातील स्वच्छतेमुळे कोरोनासारख्या अन्य रोगांचा, साथीच्या आजारांचा तितका प्रादुर्भाव विटा नगरीत दिसून येत नाही. यामध्ये "शहराची स्वच्छता" हे महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा शहरात स्वच्छतेची वज्रमुठ आपण करत आहोत व असलेल्या स्वच्छतेला अधिकचे बळ देत आहोत. यासाठी विटा नगरपरिषद स्वच्छ शहर अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित आहे. आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत स्वच्छ शहर अंमलबजावणी कक्षात नितीन चंदनशिवे व कोमल हसबे यांची हरहुन्नरी टीम यशस्वीपणे काम करत आहे. शहर स्वच्छतेत द रियल हीरो अर्थात सफाई कर्मचारी यांच्या अतुलनीय योगदान हे सदैव संस्मरणीय व अभिमानास्पद आहे. शहरातील नागरिकांनी स्वच्छतेच्या या लोकचळवळीत आपले बहुमोल योगदान असेच कायम द्यावे असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी विटेकर नागरिकांना केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise