निंबवडेत दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह तर जिल्ह्यात आज चौघांना कोरोनाची लागण : कोरोनाग्रस्तांची संख्या १८२ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, June 9, 2020

निंबवडेत दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह तर जिल्ह्यात आज चौघांना कोरोनाची लागण : कोरोनाग्रस्तांची संख्या १८२


निंबवडेत दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह तर जिल्ह्यात आज चौघांना कोरोनाची लागण : कोरोनाग्रस्तांची संख्या १८२ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/वार्ताहर : आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सांगली जिल्ह्यात आज चौघेजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
निंबवडे येथील ७० वर्षीय पुरुष ठाणे येथून तर ७० वर्षीय महिला मुंबई येथील आली असल्याचे समजत आहे. तर आज जिल्ह्यात किनरेवाडी ता. शिराळा, विहापूर ता. कडेगाव येथील प्रत्येकी एकजण व निंबवडे ता. आटपाडी येथे दोघे जण असे एकूण ४ कोरोना रुग्ण मिळून आल्याने रुग्णांची संख्या 182 झाली आहे. तर उपचाराखाली रुग्ण संख्या 75 आहे. यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून एक जण कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Advertise