Type Here to Get Search Results !

आटपाडी आगाराची बस सेवा आज बंद राहणार ; तालुक्यात सापडलेले कोरोनाचे रुग्ण व मंदावलेली प्रवाशी संख्येमुळे निर्णय


आटपाडी आगाराची बस सेवा आज बंद राहणार ; तालुक्यात सापडलेले कोरोनाचे रुग्ण व मंदावलेली प्रवाशी संख्येमुळे निर्णय 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचा वाढलेलेली संख्या, त्यातच,एसटीच्या चालकांना झालेली कोरोनाची बाधा व मंदावलेली प्रवाशी संख्या यामुळे आज आटपाडी आगाराची वाहतूक सेवा बंद राहणार असल्याची माहिती आल्याची माहिती आगारप्रमुख सदाशिव कदम यांनी दिली.
आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. छत्तीसगडला मजूर सोडण्यासाठी गेलेल्या एसटी च्या तीन चालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. प्रवाशी संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे आटपाडी सांगली दरम्यान होणाऱ्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवस या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने आटपाडी बसस्थानकातून काल व आज एकही बस सुटली नाही. मंगळवार पासून आटपाडी सांगली बस सेवा पुन्हा सुरू होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies