दिशा पटानीच्या शुभेच्छांवर आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 14, 2020

दिशा पटानीच्या शुभेच्छांवर आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर


दिशा पटानीच्या शुभेच्छांवर आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर
मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस झाला. त्यांच्यासह कधी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या अफेअरमुळे कधी आदित्य ठाकरेंशी नाव जुळल्यामुळं तर सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा देखील वाढदिवस होता. या निमित्ताने तिने आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं टवीट केलं. या टवीटला आदित्य यांनी उत्तर दिलं आहे. ’वाढदिवसाच्या शुभेच्छा, स्टे दी अमेझिंग यू अँड कीप शायनिंग’ असं तिनं म्हटलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी तिला उत्तर देताना ’खूप खूप धन्यवाद दिशा! तू अशा काही लोकांपैकी एक आहेस, ज्यांना मी 13 जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ’सेम टू यू’ म्हणू शकतो! कीप शायनिंग अँड रायझिंग!’ असं आदित्य म्हणाले.
13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे. काल तिचा 28 वा वाढदिवस होता. तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. आदित्य यांचा 30 वा वाढदिवस होता. आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी हे दोघे चांगले मित्र आहेत. ते काही वेळा डिनर डेटला गेल्याची देखील माहिती समोर आली होती. गेल्यावर्षी आदित्य यांच्यासोबत डिनर डेटला गेल्यावर दिशाला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिनं ’मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न ट्रोलर्सना विचारला होता. पुरुष किंवा स्त्री यावरुन मी मित्रांची निवड करत नाही. मी ज्याच्यासोबत फिरते ते माझे मित्रच आहे. मी केवळ मुलींसोबतच मैत्री करत नाही. प्रत्येकाचेच मुली आणि मुलं असे मित्र असतात, असं दिशा म्हणाली होती.
दिशाबाबत अनेकदा आदित्य यांनी दिलेल्या मिश्किल उत्तरांमुळं त्यांची मैत्री चर्चेच असते. विधानसभा निवडणुकीदरम्यान तुमच्या प्रचारालाचा खास बॉलिवूड सेलिब्रिटी येणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे काहीसे लाजले होते. बॉलिवूड सेलिब्रिटी तुमच्या प्रचाराला येणार आहे का, ज्याच्यामुळे तुमच्या प्रचाराला वेगळी ’दिशा’ मिळेल? यावर आदित्य ठाकरे यांनी आमचा सेलिब्रिटी हा शिवसैनिक असतो,‘ असं उत्तर दिलं होते. 

No comments:

Post a Comment

Advertise