कृषी सहाय्यक बाळसाहेब माने यांचे अपघाती निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 28, 2020

कृषी सहाय्यक बाळसाहेब माने यांचे अपघाती निधन


कृषी सहाय्यक बाळसाहेब माने यांचे अपघाती निधन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक असलेले बाळासाहेब माने यांचे अपघाती निधन झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक पदावर ते कार्यरत होते. आटपाडी मंडल मधील लेंगरेवाडी व मासाळवाडी येथे कृषी सहाय्यक म्हणून काम पाहत होते. दिनांक २७ रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान सांगोला तालुक्यातील चोपडी नजीक ट्रॅक्टर व दुचाकी अपघाती मध्ये निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. करंजे ता.खानापूर येथील मूळ गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभावाचे असल्याचे त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवशीचा माती सावडण्याचा कार्यक्रम दिनांक ३० रोजी करंजे येथे सकाळी ८.३० वा. होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.   

No comments:

Post a Comment

Advertise