सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे 9 नवीन रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, June 1, 2020

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे 9 नवीन रुग्ण


सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे 9 नवीन रुग्ण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात काल कोरोनाचे नवे 9 रुग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यायत पाच रुग्ण वाढले आहेत. तर नेर्ली ता. कडेगाव येथे दोन,  शेटफळे ता. आटपाडी, आवंढीता. जत येथे प्रत्येकी एक रुग्ण वाढला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 121 झाली असून त्यातील 52 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून काल दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.
औंढी ता.जत येथील 55 वर्षीय व्यक्ती, कडेबिसरीतील 48 वर्षीय व्यक्ती, खिरवडे ता.शिराळा येथील 56 वर्षीय पुरुष, मणदुर ता. शिराळा येथील 81 वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सोहोली ता.कडेगाव येथील 54 वर्षीय व्यक्ती, आटपाडी येथील 27 वर्षीय तरूण असे दोघे कोरोनामुक्त झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise