Type Here to Get Search Results !

822 विशेष श्रमिक ट्रेनद्वारे 12 लाख परप्रांतिय कामगार स्वगृही : गृहमंत्री अनिल देशमुख


822 विशेष श्रमिक ट्रेनद्वारे 12 लाख परप्रांतिय कामगार स्वगृही : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्व:गृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक मे एक जून या महिनाभरात जवळपास 11 लाख 86 हजार 212 परप्रांतीय कामगारांना स्व:गृही परत पाठविण्यात आले. यासाठी 822 विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन
आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 450 बिहारमध्ये 177, मध्यप्रदेशमध्ये 34, झारखंडमध्ये 32, कर्नाटक मध्ये 6, ओरिसामध्ये 17, राजस्थान 20, पश्चिम बंगाल 47, छत्तीसगडमध्ये 6 यासह इतर राज्यांमध्ये एकूण 822 ट्रेन या सोडण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमु‘याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून 136, लोकमान्य टिळक टर्मिनल 154, पनवेल 45, भिवंडी 11, बोरीवली 71, कल्याण 14, ठाणे 37, बांद्रा टर्मिनल 64, पुणे 78, कोल्हापूर 25, सातारा 14, औरंगाबाद 12, नागपुर 14 यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies