Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात आज ११ कोरोनाचे रुग्ण ; पलूसमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण : सर्वजण मुंबईहून आलेले ; सांगली जिल्ह्यात कोरोनाचा आकडा लागला वाढू


सांगली जिल्ह्यात आज ११ कोरोनाचे रुग्ण ; पलूसमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण : सर्वजण मुंबईहून आलेले ; सांगली जिल्ह्यात कोरोनाचा आकडा लागला वाढू 
माणदेश एक्सप्रेस न्युज
पलुस : पलुस येथे ५५ वर्षीय कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले असून संस्था क्वारंनटाइन मध्ये होते.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा हा कोरोनाच्या बाबतीत सेफ जिल्हा होता. सुरुवातीला इस्लामपूर मुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली होती. परंतु ते सर्व रुग्ण निगेटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्तीच्या पॅटर्न चा राज्यात बोलबाला झाला होता. परंतु लॉकडाऊन ४ पासून सर्व नागरिकांना परवानगी कडून प्रवाशाची संधी मिळाली त्यामुळे राज्यात असणाऱ्या पुणे-मुंबई या कोरोना हॉटस्पॉट मधुन मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यातच प्रामुख्याने डोंगरी तालुका म्हणून ओळखला जाणारा शिराळा तालुक्यात व कडेगाव तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडू लागले. तर जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भाग समजला जाणारा आटपाडी तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना पलूस तालुका मात्र शांतच होता. परंतु पलूसमध्ये हि कोरोनाचे शिरकाव केला असून आज एकदम ६ रुग्ण वाढल्याने पलूसकरांना धक्का बसला आहे.     
तर शिराळा तालुक्यातील मांगले येथील दोन भाऊ, मणदूर येथील ७२ वर्षीय महिला, जत येथील ५० वर्षीय महिला तर वाळवा तालुक्यातील येलूर येतील ६५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. तर आज जिल्ह्यात ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 
आजचे नवीन ११ रुग्ण धरून जिल्ह्यात १७८ कोरोना  पॉझिटीव्ह रुग्ण रुग्ण झाले असून आजपर्यंत ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ७२ रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies