Sweaty News I तुरळक झालेल्या पावसाने आज दिवसभर आटपाडीकर होणार घामाघूम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 11, 2020

Sweaty News I तुरळक झालेल्या पावसाने आज दिवसभर आटपाडीकर होणार घामाघूम


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : काल रात्री आटपाडी शहरात झालेल्या तुरळक पावसाने आज आटपाडीकर जनता मात्र घामाघूम होणार आहे.
गेल्या आठवड्यापासून तालुक्यासह शहरामध्ये उन्हाचा तडाखा वाढला होता. तापमान ४० अंशावर गेले होते. देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरीका घरातच आहेत. बाहेर पडायला संचाबंदीचे १४४ कलम लागू आहे. त्यामुळे बाहेर फेरफटका मारण्यास नागरीक धजावात नसल्याने घरातच बसून घामाघूम होवू लागल्याने झोप ही उडाली आहे. सकाळी ८ वाजले की उकाड्यास सरुवात होवू लागल्याने कामे तरी कधी करायची हा प्रश्न लोकांनपुढे निर्माण झाला होता. 
त्यातच काल सकाळपासून वातावरणामध्ये बदल जाणवू लागले होते. त्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता होती. सांयकाळी ५ च्या दरम्यान विजा चमकू लागल्या व आभाळ गडगडायला लागले. त्यामुळे मोठा पाऊस होईल असा अंदाज असताना रात्री ८ च्या सुमारास तुरळक पाउस पडल्याने “गर्जेल तो पडले काय” या म्हणीप्रमाणे पाऊस नुसता गरजलाच पण म्हणावा असा पडला नाही. त्यामुळे आज दिवसभर आटपाडीकर उकाड्याने पुरते हैराण होणार आहेत.  

No comments:

Post a Comment

Advertise