Type Here to Get Search Results !

सांगलीत आणखी एकजण कोरोना पॉझिटिव ; जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १५ वर


माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : मुंबईहून वाळवा तालुयातील कुंडलवाडी येथे आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली असून आज जिल्ह्यामध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.
गुजरात अहमदाबाद येथून खानापूर तालुक्यातील साळशिंगे, तासगाव तालुक्यातील गव्हाण हे सांगली जिल्ह्यातील तर माण तालुक्यातील विरळी येथे काही लोक आले होते. या कुटुंबासोबत या दहा वर्षाच्या मुलाने अहमदाबाद ते भिकवडी (ता.कडेगाव) असा प्रवास केला होता. याठिकाणी त्याचा स्वब घेण्यात आला होता. याचा अहवाल शुक्रवारी पहाटे प्राप्त झाला. त्यामध्ये तो पॉझिटिव आढळला आहे दरम्यान या मुलाचे आई-वडील निगेटिव्ह असल्याचेही समोर आले. त्यामुळे कडेगाव तालुक्यातील भिकवडी व वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी या गावामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने सध्या जिल्ह्यात उपचारातील रुग्ण संख्या आता १५  वर जाऊन पोहचली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies