सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोणाबाधित : जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 18, 2020

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोणाबाधित : जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी


सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोणाबाधित : जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी
सांगली : दिल्लीवरून दि.13 मे रोजी आलेल्या आटपाडी येथील 29 वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिल्लीवरून आल्याने त्यांना आटपाडी येथे कम्युनिटी क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. काल मिरज सिव्हिल येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. व स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सदर इसमाची पत्नी व मुलगीही आयसोलेशन कक्षात असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.  तर कुंडलवाडी येथील कोरोणाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईक इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेला होता. सदर व्यक्तीचा इस्लामपूर येथे स्वाब  घेण्यात आला होता. सदरचाअहवाल प्राप्त झाला असून कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात उपचारा खालील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 20 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise