राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे ; आरोग्य मंत्री राजेश टोपे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 12, 2020

राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे ; आरोग्य मंत्री राजेश टोपे


माणदेश एक्स्प्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : देशामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याची नोंद महाराष्ट्र राज्याच्या नावे झाली असून आज ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विटरद्वारे ट्विट करून दिली आहे.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सर्व देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले असून संचारबंदीचे कलम लागू आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने व सध्यातरी त्याच्यावरती कोणताच इलाज नसल्याने सोशल डिस्टन्सिंग हाच मोठा पर्याय आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा त्याच्यावर दुसरा उपाय आहे. त्यामुळे सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाली. आतापर्यंत राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise