देशात दिवसाला २ लाख पीपीई कीट व व मास्क तयार होतात. मग जातात कुठे? : काँग्रेसच्या या प्रवक्त्याचा भाजपला सवाल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 16, 2020

देशात दिवसाला २ लाख पीपीई कीट व व मास्क तयार होतात. मग जातात कुठे? : काँग्रेसच्या या प्रवक्त्याचा भाजपला सवाल


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : देशात दिवसाला २ लाख पीपीई कीट व व मास्क तयार होतात असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामुळे देशातील कोरोना युध्दात लढणाऱ्या प्रत्येकाला पीपीई कीट व N-95 मास्क हे उपलब्ध आहेत. या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतला आहे.
त्यांनी twitter च्या माध्यामातून अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील एक फोटो शेअर केला असून या रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेस हे सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन करत आहेत. कारण त्यांना पीपीई कीट (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) व एन ९५ मास्क मिळाले नाहीत.
त्यामुळे देशात जर दिवसाला २ लाख पीपीई कीट व एन ९५ मास्क तयार होतात तर जातात कुठे? असा सवाल करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.


No comments:

Post a Comment

Advertise