राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेला शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांचे अर्ज दाखल I जयंत पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 11, 2020

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेला शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांचे अर्ज दाखल I जयंत पाटील


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या  माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वजनदार नेते शशिकांत शिंदे व विधानसभेला राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ, स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. त्यामुळे आता शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसकडून राजेश राठोड, तर भाजप कडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह पाटील, डॉ. अजित गोपछडे हे उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध होणार असून फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise