अंकलेतील त्या कोरोना बाधिताच्या मित्रालाही लागण ; सांगलीत आणखी तीन जण कोरोना बाधित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 12, 2020

अंकलेतील त्या कोरोना बाधिताच्या मित्रालाही लागण ; सांगलीत आणखी तीन जण कोरोना बाधित


माणदेश एक्स्प्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोना बाधित झाले असून यामध्ये मिरज होळीकट्टा येथील 68 वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर अंकले ता. जत येथील कोरोना बाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोना बाधित झाला आहे. कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केले असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे. या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise