corona-virus I खानापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव I या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 10, 2020

corona-virus I खानापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव I या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : साळशिंगी ता.खानापूर येथे आहमदाबादवरून एक कुटुंब आले होते. त्यांची तपासणी विटा ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली. विटा ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून सदर पती-पत्नीला मिरज सिव्हील हॉस्पिटलकडे संदर्भित करण्यात आले. यापैकी महिला (वय 30) चा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सदर महिलेच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पथक रवाना झाले असून प्रशासनातर्फे अनुषंगिक उपाययोजना तात्काळ करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली..

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

1 comment:

Advertise