...वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, 'तुमच्यासाठी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 9, 2020

...वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, 'तुमच्यासाठी


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी :  भाजपने पंकज मुंडे यांना विधानपरिषद नाकारल्यानंतर त्यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ...वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, 'तुमच्यासाठी असे ट्विट करून धीर दिला आहे. तर भाजपच्या त्या चार उमेदवारांना आशीर्वाद दिला आहे.
भाजपने नुकतीच विधानपरिषदसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामध्ये भाजपने जेष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह पाटील, अजित गोपछडे यांना उमेदवारी दिल्याने हे जेष्ठ नेते नाराज झाले होते. यात सगळ्यात पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात होता. परंतु त्यांनी नाराजी व्यक्त केली नव्हती परंतु त्यांनी ट्विट करत . 'आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!,' असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार का? भाजपमध्येच राहणार यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.


No comments:

Post a Comment

Advertise