भाजपने विधानपरिषदेला या नेत्यांना का डावलले? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 8, 2020

भाजपने विधानपरिषदेला या नेत्यांना का डावलले?


भाजपने विधानपरिषदेला या नेत्यांना का डावलले?
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे  : राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या जेष्ठ व तगड्या नेत्यांना का डावलले हा राज्यातील जुन्या भाजपच्या व त्या-त्या समर्थक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. आपल्या नेत्याचे नेमके चुकले कुठे? कशामुळे तिकीट नाकारले? यासारखे अनेक प्रश्न त्यांना पडले असणार.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून आपल्याला पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. माजी मंत्री व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांनी मागणी केली होती. तसेच सरकारी कोणतीही बाकी नसल्याचे पत्र देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. विनोद तावडे यांचे पक्षासाठी उमेदवारी मागितली नसली तरी सुद्धा सोशल मिडीयाच्या माध्यामातून त्यांच्या नावाचा जोर होता. माजी मंत्री व आर्थिक पाठबळ बलाढ्य असलेले तसेच मंत्री नितीन गडकरी समर्थक विदर्भातील प्रमुख नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक म्हणून तिकीटाच्या शर्यतीत राहिले होते. 
परंतु परंतु सोशल मीडियातून बातम्यामधून प्रसिद्ध नावावर भाजपच्या केंदीय निवडणूक समितीने फुली मारली व या जेष्ठ नेत्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली. कारण जेष्ठ या नात्याने एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकज मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे सध्याच्या राज्यातील भाजपच्या नेतृत्वाला कदाचित जड गेले असते. त्यामुळेच त्यांची नावे मागे राहिली व आपल्या शब्दाबाहेर न जाणाऱ्या युवा नेत्यातील रणजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके. अजित गोपछडे यांना सध्याच्या नेतृत्वाने उमेदवारी देवून आपली बाजू अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढील काळात भाजप या जेष्ठ नेत्यांचे राजकीय पुनर्वसन  करणार का? यावरच या जेष्ठ नेत्यांचे पुढेचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.No comments:

Post a Comment

Advertise