Type Here to Get Search Results !

मंत्री जयंत पाटलांच्या पुढाकाराने अखेर ते आपल्या मायभूमी परतले


माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील ४८० नागरिकांना घेवून एसटी महामंडळाच्या १६ बसेस शुक्रवारी रात्री रवाना झाल्या होत्या. आज हे ४८० नागरिक तामिळनाडूत सुखरूप आपल्या मायभूमीत पोहोचले आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे या नागरिकांना आपल्या मायभूमीत परतण्यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करत होते. 


या नागरिकांच्या स्वगृही परतण्यावर मंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच या कठीण काळात ज्यांनी सहकार्य केले त्यांचेही ट्विटरद्वारे आभार मानले आहेत. जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सांगलीत अडकलेल्या तामिळनाडूच्या ४८० नागरिकांना आम्ही प्रशासनाच्या मदतीने सुखरूप घरी पोहोचवले. सर्वांची प्राथमिक आरोग्य चाचणी करून त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १६ बसने रवाना करण्यात आले. मला आनंद होत आहे की सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, प्रवासात योग्य ती काळजी घेत, अन्नपुरवठा करत तामिळनाडू येथील नागरिकांना स्वगृही नेण्यात आले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पार पडल्याबद्दल त्यांचे आभार. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर स्वगृही परतलेल्या नागरिकांनी पुन्हा सांगलीत यावे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies