आटपाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना पीपीई कीटचे वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 9, 2020

आटपाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना पीपीई कीटचे वाटप


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने व शहरातील व इतर भागामध्ये नोकरी व व्यवसाया निमित्त असलेल्या नागरिकांना आपपल्या गावी जाण्याची परवानगी सरकारने दिली असल्याने आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लोकांची आवक सुरु आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील डॉक्टरांना व स्टाफ ला पीपीई कीट ची आवश्यकता असल्याने मतदार संघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते शहा कन्ट्रक्शन कोल्हापूर यांचे सीएसआर फंडातून 25 पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. 

यावेळी शहा कन्ट्रक्शनचे पार्थ हेमंत शहा, भैय्या शहा, आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली पाटील, माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील, आटपाडी तालुका शिवसेनाप्रमुख साहेबराव पाटील, सोसायटीचे चेअरमन अरविंद चव्हाण तसेच ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तांबोळी व रुग्णालयातील स्टाफ यावेळी उपस्थित होता.


No comments:

Post a Comment

Advertise