बीड मध्ये पतीने पत्नीसह दोन मुलांची निर्घृण केली हत्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 24, 2020

बीड मध्ये पतीने पत्नीसह दोन मुलांची निर्घृण केली हत्या


बीड मध्ये पतीने पत्नीसह दोन मुलांची निर्घृण केली हत्या
माणदेश एक्सप्रेस न्युज
बीड : बीड मधील एका महिलेसह दोन मुलांची क्रूर हत्या करण्यात आल्याचा प्रकार आज दुपारी समोर आला. महिलेच्या व एका मुलाच्या डोक्यात वार केला गेला तर एका मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले गेले आहे. तिहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. 
या महिलेच्या पतीला पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो स्वत:च पेठ बीड पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन आला होता. मृत महिलेचे नाव संगिता संतोष कोकणे असून तिचे अंदाजे वय ३० वर्षे आहे. तर संदेश (वय ११ वर्षे) व मयूर (वय ७ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व इतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise