भाजपने रिपाइंला विधानपरिषदेची जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 9, 2020

भाजपने रिपाइंला विधानपरिषदेची जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत चार उमेदवारांची नावे भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहेत. अनुक्रमे पक्षाने स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील व डॉ.अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली. आहे. त्यामुळे घटक पक्ष असलेला आरपीआय नाराज झाला असून याबाबत पक्षाचे प्रमुख मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी ट्विट करीत नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रमुख घटक पक्ष म्हणून आरपीआय आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात आरपीआयची ताकत असली तरी स्थानिक पातळीवरूनच राजकारण केले जाते. याचा अनेकवेळा मोठ्या प्रमाणात भाजपला फायदाच झाला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत आरपीआयला एक जागा मिळेल अशी आशा रामदास आठवले यांना होती. पक्षाकडून तशी तयारी करण्यात आली होती. परंतु या सगळ्यावर पाणी फिरले असून आरपीआय ग्रहीत धरण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे याचे परिणाम स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणामध्ये होणार असून याचा भाजपा फायदा होणार का तोटा हे भविष्यात पहावयास मिळतील. तूर्तास तरी आरपीआयची नाराजी भाजप कशी दूरू करणार हे रामदास आठवले यांनाच माहिती असणार. No comments:

Post a Comment

Advertise