सांगोला शहरात दुकाने सुरु करण्याचा बाबतचा आदेश ; पहा कोणत्या वारी कोणत्या भागातील दुकाने सुरु राहणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 8, 2020

सांगोला शहरात दुकाने सुरु करण्याचा बाबतचा आदेश ; पहा कोणत्या वारी कोणत्या भागातील दुकाने सुरु राहणार


सांगोला शहरात दुकाने सुरु करण्याचा बाबतचा आदेश ; पहा कोणत्या वारी कोणत्या भागातील दुकाने सुरु राहणार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/सचिन धांडोरे : आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांचेमार्फत जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनानुसार आदेश प्राप्त झालेले आहेत. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे उपरोक्त आदेशाप्रमाणे सांगोले शहरातील व्यापारी आस्थापना सुरु करणेबाबत शहरातील प्रमुख व्यापारी आस्थापनांचे पदाधिकारी यांची बैठक घेवून चर्चा करुन सर्वानुमते खालील भागनिहाय (पान टप-या, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री, चहाची दुकाने, भेळ/वडापावचे व इतर खाद्य पदार्याचे गाडे, सलून व मद्यविक्री वगळता) इतर सर्व दुकाने आठवडयातील 3 दिवस त्या भागाचे रकान्यात नमूद केलेले दिवशी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळेत उघडणेस परवानगी देण्यात येत आहे. सांगोले शहरातील दुकाने चाल ठेवणेबाबतचा तपशील..

वार सोमवार, बुधवार व शुक्रवार | सकाळी 7.00 | ते रात्री 7.00

भाग 
कडलास रस्ता ते मणेरी | चौक ते नेहरु चौक ते | आण्णाभाऊ साठे पुतळा ते | | डॉ. आंबेडकर उद्यान ते | - पंढरपूर रोड (रस्त्याची पूर्व बाजू) 

येणारी गल्ली
कडलास रस्ता, | मुजावरगल्ली, देशपांडेगल्ली, | | कुंभारगल्ली, शिवाजीचौक, | भोसेकरबोळ, जयभवानी | चौक, आ.क्र. 24, 59, 60, 23, | सनगरगल्ली, भारतगल्ली, | पोलीस वसाहत, साठेनगर, भिमनगर, आनंदनगर, यशनगर, अयोध्यानगरी, पाटीलवस्ती, बिलेवाडी

सुरु ठेवणेत येणारी दुकाने
स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स, कापड, | रेडीमेड कपडे, फर्निचर, फॅब्रिकेशन, बांधकाम साहित्य, स्वीटहोम, चप्पल, | हार्डवेअर, भांडी, सौदर्य प्रसाधने, गिफ्ट | शॉपी, सुप-दुरडी/केरसुणी विक्रेते, ज्वेलर्स, | फोटो स्टुडिओ, टेलरिंग, गॅरेजेस, मशिनरी | व ॲटोमोबाईल, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, हार/फ्ले, घडयाळे विक्री, | सॉ मिल, प्रिंटींग प्रेस, खाजगी कार्यालय (वकील, सीए), 

वार मंगळवार, गुरुवार व शनिवार सकाळी 7.00 ते रात्री 7.00

भाग
कडलास रस्ता ते मणेरी | चौक ते नेहरु चौक ते आण्णा भाऊ साठे पुतळा | | ते डॉ. आंबेडकर उद्यान ते | पंढरपूर रोड (रस्त्याची पश्चिम बाजू)

 येणारी गल्ली/भाग
अलराईननगर, वासूदरोड | स्टेशनरीवसाहत, मिरजरोड वसाहत, | रेडीमेड | फुले चौक, कोष्टीगल्ली, | खंदकभाग, स्टेशनरोड, | हार्डवेअरतेलीगल्ली, वजाबादपेठ, | इंदिरानगर, विद्यानगर, फोटो चिंचोलीरोड वसाहत, एखतपूररोड वसाहत, | पुजारवाडी, माळवाडी, | बनकरमळा, चांडोलेवाडी 

सुरु ठेवणेत येणारी दुकाने 
स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स, कापड, | रेडीमेड कपडे, फर्निचर, फॅब्रिकेशन, | बांधकाम साहित्य, स्वीटहोम, चप्पल, | हार्डवेअर, भांडी, सौदर्य प्रसाधने, गिफ्ट | शॉपी, सुप-दुरडी/केरसुणी विक्रेते, ज्वेलर्स, फोटो स्टुडिओ, टेलरिंग, गॅरेजेस, मशिनरी व अॅटोमोबाईल, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक्स, | मोबाईल शॉपी, हार/फ्ले, घडयाळे विक्री, | सॉ मिल, प्रिंटींग प्रेस, खाजगी कार्यालय (वकील, सीए)

आठवडयातील | सर्व दिवस चालू | सकाळी 7.00 रात्री 7.00
अत्यावश्यक सेवेतील किराणा, दूध व्यवसाय, भाजीपाला, फळे, मेडिकल, खते व बियाणे, कृषी अवजारे व मशिनरी, दवाखाने व हॉस्पीटल, | (फक्त पार्सल व घरपोच सेवा) रेष्टारंट, धाबे, आईस्क्रीम, हॉटेल 

 रविवार विशेष सूचना -
रविवार : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी आस्थापना बंद राहतील.

ही दुकाने सुरु ठेवण्यासाठी विशेष सूचना देण्यात आलेल्या असून यामध्ये 1) दैनंदिन भाजी मंडई व आठवडा बाजार पर्णपणे बंद राहतील. सकाळी 07.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळेमध्ये प्रभागामध्ये फिरुन भाजी व फळे विक्री करता येतील. तसेच ज्यांचे स्वतःचे भाजी व फळ विक्रीचे पक्के व स्थिर दुकान त्यांनीही सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळेतच विक्री करणेचे आहे. 2) 65 वर्षावरील जेष्ट नागरीक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालील बालके, आजार असणा-या व्यक्ती, अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवा वगळता बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. 3) सर्व दुकानदारांनी व्यवसायचे ठिकाणी हॅन्डवॉश सुविधा/ हॅन्ड सॅनिटायझर सुविधा ठेवणे बंधनकारक आहे. शासकीय पथकामार्फत कोणत्याही क्षणी तपासणी करण्यांत येईल. आढळून न आल्यास तातडीने कारवाई केली जाईल 4) सर्व दुकानदारांनी व्यवसायाचे ठिकाणी फिजीकल डिस्टन्सींगचे चौकोन/गोल आखून घेणे बंधनकारक आहे. शासकीय पथकामार्फत कोणत्याही क्षणी तपासणी करण्यात येईल. आढळून न आल्यास तातडीने कारवाई केली जाईल 5) व्यवसायाचे ठिकाणी मालक व कामगारांनी मास्क, हॅन्डग्लोज, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्डवॉशचा वापर करणे बंधनकारक आहे. शासकीय पथकामार्फत कोणत्याही क्षणी तपासणी करण्यांत येईल.आढळून न आल्यास तातडीने कारवाई केली जाईल 6) किराणा होलसेल व रिटेल, किराणा बझार, किराणा सुपर मार्केट यांनी ग्राहकांना आत न घेता त्यांच्याकडून यादी घेवून काऊंटर बाहेर साहित्य आणून द्यावे. 7) सर्व प्रकारच्या दुकानदारांनी त्यांचे दुकान ज्या दिवशी सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्याचे बोर्ड करुन दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. 8) सर्व वारनिहाय नियोजन हे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून केलेले आहेत. त्यामुळे सदर नियोजनाचे पालन करणे सर्व व्यापारी आस्थापनावर बंधनकारक आहे. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
          वरील प्रमाणे नियोजन हे दिनांक १७/५/२०२० अथवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंधनकारक असून दरम्यानच्या कालावधीमध्ये वस्तूस्थितीनुसार व वेळेनुसार यामध्ये बदल होवू शकतो. झालेले बदल सर्वाना तातडीने कळविले जातील. याबाबत काही शंका असल्यस नगरपरिषदेकडील 24 तास टोल फ्री नंबर 18002332190 वर संपर्क करावा. तसेच सांगोले शहरातील सर्व नागरिकांना नम्र विनंती करण्यांत येते की, सदरच्या सुविधा या आपल्या हितासाठी सुरु ठेवण्यात येत आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, एका घरातील एकाच व्यक्तीने त्यांना दिलेल्या पासवर नमद दिवशीच घराबाहेर पड़ा, घराबाहेर पडताना मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्डवॉश व हॅन्डग्लोजचा वापर करा. घरातील जेष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाच्या आतील लहान बालके असल्यास त्याची विशेष काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सांगोले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी केले आहे. No comments:

Post a Comment

Advertise