केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या २० कंपन्यांची केंद्राकडे मागणी : गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 13, 2020

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या २० कंपन्यांची केंद्राकडे मागणी : गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती


माणदेश एक्स्प्रेस ऑनलाईन टीम 
मुंबई : कोरोना संसर्गजन्य विषाणूमुळे राज्याच्या पोलीस दलावर प्रचंड ताण येत असल्याने त्यामुळे त्यांना थोडी विश्रांतीची गरज आहे. यासाठी आता राज्याच्या गृहखात्याने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) वीस कंपन्या म्हणजेच 2000 केंद्रीय पोलिसांची मागणी केली आहे. याबाबतची माहिती राज्यचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पोलीस दलाची मागणी केली होती. त्यानुसार आता अनिल देशमुख यांनी देखील मागणी केली आहे. राज्यातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कामाची वेळ दिवसागणिक वाढत आहेत. शिवाय रमजान ईद ही येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. सध्या राज्य राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या 32 कंपन्या पोलीस दलाच्या मदतीला आहेत. मात्र सततच्या कामाच्या ताणामुळे पोलिसांनाही विश्रांतीची गरज आहे. ही बाब लक्षात घेता राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात, अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान राज्यात कोरोना बाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील तब्बल एक हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण आली आहे. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे पोलीस ही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise