शासकीय कामात अडथळा ; म्हसवड येथील नगरसेवकावर गुन्हा दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 13, 2020

शासकीय कामात अडथळा ; म्हसवड येथील नगरसेवकावर गुन्हा दाखल


माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड :  म्हसवड नगरपालिकेतील गटनेते व विद्यमान नगरसेवक अकिल काझी यांचे वर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,  हा गुन्हा पोलिस फौजदार अमोल कदम यांनी दाखल केला आहे. 
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की म्हसवड पोलिस ठाण्याचे पी.एस.आय.अमोल कदम हे कोरोना व्हायरसच्या संकट काळात शहरातील महात्मा फुले चौकात कर्तव्य बजावत असताना त्यांना नगरसेवक अकिल काझी हे विना मास्क बांधता बसले असल्याचे निदर्शनास आले असता कदम यांनी काझी यांना मास्क बांधणे बाबत सांगितले असता नगरसेवक अकिल काझी व पी.एस.आय.अमोल कदम यांच्यात वादावादी झाली. मी नगरसेवक आहे. जा तुला काय करायचं ते कर असे म्हणून पी.एस.आय.अमोल कदम यांना धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले असून पुढील तपास सपोनि गणेश वाघमोडे करत आहेत. 
दरम्यान नगरसेवक अकिल काझी यांनी तक्रार अर्ज दिला असून मास्क न वापरले बद्दल रितसर दंड भरला असताना मला दमदाटी करण्यात आली असून गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक अकिल काझी यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Advertise