अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग सुरू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 11, 2020

अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग सुरू


माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : कोरोना विषाणूपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अजनाळे ता. सांगोला, जि. सोलापुर  ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग सुरू असल्याची माहिती ग्रामसेवक शहाजीराव इंगोले यांनी दिली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला तालुक्यातील आजनाळे ग्रामपंचायतीने थर्मल स्क्रीनिंग मशीन उपलब्ध करून नागरिकांची तपासणी सुरू केली आहे त्याचा प्रारंभ काल सोमवार दिनांक ११ मे रोजी सरपंच अर्जुन कोळवले यांच्या हस्ते करण्यात आला.
अजनाळे गाव हे कोरोना मुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. गावामध्ये परगावाहून आलेल्या नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्यात येणार आहे. गावातील नागरिकांनी प्रशासनास खरी माहिती देऊन सहकार्य करावे अशी विनंती सरपंच अर्जुन कोळवले यांनी केली आहे. याप्रसंगी सरपंच अर्जुन कोळवले, गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, पोलीस पाटील  संतोष भंडगे, पत्रकार सचिन धांडोरे, आरोग्य सेवक अशोक कलाल, आरोग्य सेविका सिंधू गडदे, आशा वर्कर पल्लवी धांडोरे, प्रशांत बनसोडे, महेश चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते.

No comments:

Post a Comment

Advertise