मेल्यावर पाणी पाजायला येणार का? भाजपच्या माजी मंत्र्याची मुख्यमंत्र्यांवर टीका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 24, 2020

मेल्यावर पाणी पाजायला येणार का? भाजपच्या माजी मंत्र्याची मुख्यमंत्र्यांवर टीका


मेल्यावर पाणी पाजायला येणार का? भाजपच्या माजी मंत्र्याची मुख्यमंत्र्यांवर टीका
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही; असं म्हणत पॅकेजवरून उद्धव ठाकरेंनी भाजपा अन् देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. 
मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला माजी मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..!, आमच्या कोकणी भाषेत "म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार ?, अशी टीका केला आहे. तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करून दाखवा!, असा टोलाही आशीष शेलारांनी लगावला आहे. राजकारण करू नका हे नेमकं कुणाला सांगताय? खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?, ते खासगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का?, काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही.. म्हणे "आम्ही करणार म्हणजे करणारच!" कधी? महाराष्ट्र हेच म्हणततोय साहेब आता तरी करून दाखवा!!, असं म्हणत आशीष शेलारांनी एकाचवेळी उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील व खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise