कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्य सरकारनं ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 17, 2020

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्य सरकारनं ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला


कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्य सरकारनं ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला
माणदेश एक्सप्रेस ऑनलाऊन टीम
आटपाडी : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्य सरकारनं ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला असून याबाबत मुख्य सचिवांनी आदेश काढले आहेत. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी पत्राद्वारे सर्व विभागांना लॉकडाऊन वाढविले असल्याबाबत कळवलं आहे. 'राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कायम असेल,' असं अजॉय मेहता यांनी पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज रात्री संपणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून राज्यासह देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मालेगाव, सोलापूर येथील रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise