Type Here to Get Search Results !

शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांना जप करत बसावे लागेल : आमदार अमोल मिटकरी


शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांना जप करत बसावे लागेल : आमदार अमोल मिटकरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी :  खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर शिखंडीच्या आडून जर कोणी बाण मारू पाहत असतील तर त्यांना आयुष्यभर जप करत बसावे लागेल असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी टीका करणाऱ्यांना दिला आहे. 

जुन्नर तालुक्यातील अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केल्याचं अक्षय बोऱ्हाडे याने म्हटले होते. याप्रकरणी शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं मत व्यक्त करताना, नाण्याची दुसरी बाजू तपासणेही गरजेचं असल्याचं म्हटले होते. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि काही शिवभक्तांकडून अमोल कोल्हे यांच्यावर टीका करण्यात आली. आता, कोल्हेंवरील या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे.
शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांनी एक कायम लक्षात घ्यावे, राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेजी महाराष्ट्रातील तमाम तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर भविष्यात फक्त जप करत बसावं लागेल, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समावेश केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies