आटपाडी न्यायालयात येणाऱ्यांचे होणार थर्मल स्कॅनिंग ; श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाच्या वतीने न्यायालयाला थर्मल गण भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 27, 2020

आटपाडी न्यायालयात येणाऱ्यांचे होणार थर्मल स्कॅनिंग ; श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाच्या वतीने न्यायालयाला थर्मल गण भेट


आटपाडी न्यायालयात येणाऱ्यांचे होणार थर्मल स्कॅनिंग 
श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाच्या वतीने न्यायालयाला थर्मल गण भेट 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : सांगली जिल्ह्यासह आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह येवू लागले आहेत. त्यामुळे इतरांना कोरोना चा मोठा धोका आहे.
आटपाडी येथील न्यायालयामध्ये तसेच वकिलांकडे विविध प्रकारचा निपटारा करण्यासाठी पक्षकारांची मोठी संख्या आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. सध्याच्या काळातील न्यायालयामध्ये वकील व कोर्टातील कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असल्याने यासाठी श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाचे संस्थापक अमरसिंह (बापू) देशमुख यांचे वतीने न्यायालयामध्ये थर्मल गण कोर्टातील सहाय्यक अधीक्षक श्री पवार यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी दूध संघाचे मॅनेजर श्री. दौंड, ॲड. चेतन जाधव, ॲड. श्रीराम इनामदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise