आटपाडीतील कोरोनाबाधीच्या पत्नीचा व मुलीचा अहवाल निगेटिव्ह तर ११ संशयितापैकी ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह ; ६ जणांचे अहवाल प्रलंबित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

आटपाडीतील कोरोनाबाधीच्या पत्नीचा व मुलीचा अहवाल निगेटिव्ह तर ११ संशयितापैकी ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह ; ६ जणांचे अहवाल प्रलंबित


आटपाडीतील कोरोनाबाधीच्या पत्नीचा व मुलीचा अहवाल निगेटिव्ह
तर ११ संशयितापैकी ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह ; ६ जणांचे अहवाल प्रलंबित 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये दिल्लीहून आलेल्या एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्या व्व्यक्तीच्या पत्नीचा व मुलीचा स्वब तपासणीसाठी मिरज येथील कोव्हीड रूग्णालयात पाठविण्यात आला होता. आज त्या पत्नी व मुलीचा तसेच ११ संशयीतांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. 
शहरातील पार्वती लॉज येथे दिल्लीहून आलेला व्यक्ती आपल्या पत्नी व मुलीसह क्वारंनटाईन झालेला होता. त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी अहवाल घेण्यात आला होता. त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने आटपाडी शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत परिसर सील केला. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरु झाले. त्यामध्ये त्याची पत्नी, मुलगी व ११ जणांचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला. 
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये त्याच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ११ जणांपैकी ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६ जणांचे अहवाल प्रलंबित असून आज सकाळी त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. सध्या तरी कोरोनाग्रस्ताची पत्नी व इतर ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी दिली आहे. आज प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालामुळे आटपाडीकरांची धाकधूक जरा कमी झाली असली तरी बाकीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरा धोका कळणार आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise