पिंपरी बुद्रुक कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील संशयितांचा अहवाल निगेटिव्ह ; पिंपरी बुद्रुकसह पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

पिंपरी बुद्रुक कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील संशयितांचा अहवाल निगेटिव्ह ; पिंपरी बुद्रुकसह पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा


पिंपरी बुद्रुक कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील संशयितांचा अहवाल निगेटिव्ह ; पिंपरी बुद्रुकसह पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी /मनोज कांबळे : आटपाडी तालुक्याच्या पिंपरी बुद्रुकमधे अकोला येथून आलेली व्यक्ती दि. २० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आलेल्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. आज त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी दिली. सहाही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पिंपरी बुद्रुकसह पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise