सोनारसिद्धनगर मधील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११ वर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 24, 2020

सोनारसिद्धनगर मधील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११ वर


सोनारसिद्धनगर मधील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११ वर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी  : सोनारसिद्धनगर (ता.आटपाडी) येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील सोनारसिद्धनगर येथे ४ रुग्ण झाले आहेत. सदरची महिला मुंबईहून आलेली होती.  तिला कोरोना आजाराची लक्षणे जाणवल्याने त्याला मिरज कोविड सेंटर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी सांगितले. यामुळे सोनारसिद्ध शेजारील गावांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. आज आलेल्या अहवालानुसार आटपाडी तालुक्यातील एकूण ११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise