कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मरगळे वस्तीला सरपंच वृषाली पाटील यांनी दिली भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मरगळे वस्तीला सरपंच वृषाली पाटील यांनी दिली भेट


कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मरगळे वस्तीला सरपंच वृषाली पाटील यांनी दिली भेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : मुंबईहून आटपाडी येथील मरगळेवस्ती येथे आलेली 60 वर्षीय व्यक्ती 20 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सरपंच वृषाली पाटील यांनी लागलीच मरगळे वस्ती येथे भेट देऊन आरोग्याविषयी काय उपाययोजना कराव्या लागतील त्या तात्काळ कराव्यात त्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. साधना पवार व इतर आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी ॲड. धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायत कर्मचारी सारंग यादव व ग्रामस्थ उपस्थित होते. 
ग्रामपंचायतच्या वतीने सकाळीच मरगळे वस्ती परिसर सोडियम हायपो क्लोराईड ची फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी तेथील नागरिकांना कोरोना आजार होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन केले व घरात रहा सुरक्षित रहा असे सांगून नागरिकांना दिलासा दिला. कोरोना बाबत योग्य त्या उपाय योजना ग्रामपंचायत करत आहे, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच मरगळेवस्ती, मडके वस्ती, गावडेवस्ती, मगरवस्ती, शंकर पाटीलवस्ती, गोंदीरामळा, बोराटेमळा, भिंगेवाडी पुर्व याठिकाणी क्वारंनटाईन असलेल्या नागरिकांची समक्ष भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
No comments:

Post a Comment

Advertise