शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील एकाला कोरोनाची लागण ; जिल्ह्यात २१ जण कोरोनाग्रस्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील एकाला कोरोनाची लागण ; जिल्ह्यात २१ जण कोरोनाग्रस्त


शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील एकाला कोरोनाची लागण ; जिल्ह्यात २१ जण कोरोनाग्रस्त
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना चा आज एक रुग्ण आढळून आला आहे. शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरचा रुग्ण हा मुंबईहून आला असल्याचे समजते. 
काल जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यातील एकजण व कुंडलवाडी येथील कोरोणाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईक इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेला होता त्या  व्यक्तीचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात उपचारा खालील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 20 झाली होती. त्यामध्ये आज एकने वाढ होवून ती २१ झाली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise