सभापती राणीताई कोळवले यांची महुद बु।। येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 11, 2020

सभापती राणीताई कोळवले यांची महुद बु।। येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट


माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : सांगोला पंचायत समितीच्या सभापती सौ. राणीताई कोळवले व माजी सभापती सौ. लवटे  यांनी सोमवार दिनांक  ११ मे रोजी महुद बु।।  व  व अकोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत महुद बु. येथे भेट दिली.
या वेळी त्यांनी  आरोग्य  विभागाचा  आढावा  घेऊन  प्रशासनास  योग्य त्या  सूचना केल्या. डॉक्टर व कर्मचारी यांनी आरोग्य सेवा देताना नागरिकांना योग्य सूचना देऊन मार्गदर्शन व उपाय करावेत, कोरोणा विषाणू संदर्भात नागरिकांनी योग्य ती खबरदारी व काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायत महूद बु. येथे भेट देऊन गावातील स्वच्छता, निर्जंतुनीकरण तसेच गावातील  छोटे-मोठे व्यवसाय  यासंदर्भात नियोजन करून यासंदर्भात  चर्चा केली. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केला. 
 यावेळी सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, ग्रा.वि.अधिकारी सतिश साळुंखे, डॉ.कल्याण ढाळे, डॉ चुनडे, चंद्रकांत सरतापे  यांच्यासह  ग्रामपंचायत कर्मचारी , आशा वर्कर  उपस्थित होत्या.

सांगोला तालुक्यातील काल महूद बु  व अकोला या गावांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन कोरोना विषाणू  संदर्भात माहिती जाणून घेतली  व प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या आहेत. तर १२ मे रोजी कोळा व नाझरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राणीताई कोळवले
सभापती पंचायत समिती,सांगोला 
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस 

No comments:

Post a Comment

Advertise