पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 16, 2020

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा


माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माळशिरस तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक व नातेपुते राष्ट्रीय समाज पक्षाचे नातेपुते अध्यक्ष अमरजित जानकर यांनी दिली.
कोरोना या साथीच्या आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून लहान मुलांना सध्या खेळण्यास व त्यांच्या कलागुणांना वाव मिळेना झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व त्यांचा इतिहास नव्या पिढीला समजण्यास मदत होणार आहे.
स्पर्धेचे विषय हा अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिकृती आहे. ज्यांना या अनोख्या स्पर्धेत भाग घेणेचा आहे त्यांनी आपली नावे चित्र ८६०००९८६३०/ ९४२३२३०३१७ या मोबाईल क्रमांकावर दि. २७/०५/२०२० पर्यंत पाठविण्याची आहेत. विजेत्या स्पर्धेकांची नावे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी ३१/५/२०२० रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी १०००/- ५००/- व ३००/- रुपये बक्षीसे आहेत. सदरची बक्षिसाची रक्कम विजेत्यांना Phone Pay/Google Pay द्वारे देण्यात येणार आहे.    

No comments:

Post a Comment

Advertise