दक्षता समितीत गाव पुढाऱ्यांनी ढवळाढवळ करू नये : प्रवीण मंडले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

दक्षता समितीत गाव पुढाऱ्यांनी ढवळाढवळ करू नये : प्रवीण मंडले


दक्षता समितीत गाव पुढाऱ्यांनी ढवळाढवळ करू नये : प्रवीण मंडले
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे गावात दक्षता समिती मध्ये आम्ही सर्वजण योग्य त्या दिशेने प्रशासकीय सुचनांचे पालन करत असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर तो रोखण्यासाठी सर्व प्रकारे आपलं कर्तव्य अहोरात्र निभावत आहोत. यामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आरोग्य तपासणी आणि होम किंवा संस्था क्वारंनटाइन हा महत्वाचा विषय आहे.
अलीकडे या क्वारंनटाइन वरून गावातील काही नेते स्वयंघोषित पणे निर्णय घेताना दिसून येत असून पोलीस पाटील व सरपंच यांच्या अपरोक्ष काही ठिकाणी परस्पर लोकांना घरी जाण्याच्या घटना घडताना दिसत आहेत  हा विषय गंभीर असून भावनिक नाही. याबाबत काही पुढारी वारंवार सूचना देऊन सुद्धा प्रशासकीय कामात लुडबुड करताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आमच्या कर्तव्यात लुडबुड करून दक्षता समिती चे नियम डावलुन कुणी काम करणार असेल तर यास दक्षता समिती जबाबदार राहणार नाही असे पोलीस पाटील प्रवीण मंडले म्हणाले. नागरिकांनी अधिकृत समिती, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, दक्षता समिती सदस्य यांच्या शी संपर्कात राहून सतर्क रहावे असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise