“आम्ही ठाकरे सरकार सोबत” : पलूस शिवसेनेच्या वतीने भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ च्या विरोधात “आम्ही ठाकरे सरकार सोबत फलकबाजी आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 22, 2020

“आम्ही ठाकरे सरकार सोबत” : पलूस शिवसेनेच्या वतीने भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ च्या विरोधात “आम्ही ठाकरे सरकार सोबत फलकबाजी आंदोलन


“आम्ही ठाकरे सरकार सोबत” : पलूस शिवसेनेच्या वतीने भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ च्या विरोधात “आम्ही ठाकरे सरकार सोबत फलकबाजी आंदोलन
माणदेश एक्सप्रेस न्युज
पलूस : पलूस येथे भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलच्या विरोधामध्ये  शिवसेना आणि युवासेना पलूस  तालुका यांच्या वतीने   महाराष्ट्र सरकारच्या समर्थनार्थ  “आम्ही ठाकरे सरकार सोबत” हे आंदोलन सर्व नियमांचे पालन करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शन करण्यात आले. 
भारतीय जनता पार्टीच महाराष्ट्र विषयी असलेल बेगडी प्रेम हे सर्व  महाराष्ट्राला परिचित आहे. गेलेली सत्ता परत येणार नाही हे आता त्यांच्या लक्षात आलेल आहे. स्वतःच्या पक्षातील आमदार, खासदार फुटून जाऊ नये म्हणून  महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी धूळ फेकण्याचा काम करता यावं म्हणून हे नाटके आंदोलन भारतीय जनता पार्टीने  केले. त्याच्या विरोधामध्ये शिवसेनेचे आम्ही ठाकरे सरकार सोबत हे सरकारच्या समर्थनार्थ शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून सोशल डिस्टन्सचा वापर करून हे आंदोलन शिवसेना पलूस तालुका  यांच्या वतीने करण्यात आले. सदरचे आंदोलन कोणत्या चौकात, कोणत्याही शासकीय कार्यालया समोर न करता सदरचे आंदोलन शिवसैनिक प्रशांत (दादा) लेंगरे यांच्या उपस्थित पलूस येथे करण्यात आले. यावेळी श्रीकांत लेंगरे,  सुरज सुर्वे, महेंद्र पोतदार, जगदीश पवार, अक्षय बनसोडे, सौ स्नेहल  लेंगरे, ओंकार पाटील, बजरंग लेंगरे,  गणेश माने, रोहित वंजारी आदी शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Advertise