पालकमंत्री जयंत पाटील यांनी विश्वनाथ शिरतोडेंच्या कुटुंबीयास दिली भेट ; मदतीचा धनादेश केला सुपूर्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 24, 2020

पालकमंत्री जयंत पाटील यांनी विश्वनाथ शिरतोडेंच्या कुटुंबीयास दिली भेट ; मदतीचा धनादेश केला सुपूर्त


पालकमंत्री जयंत पाटील यांनी विश्वनाथ शिरतोडेंच्या कुटुंबीयास दिली भेट ; मदतीचा धनादेश केला सुपूर्त
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथे वादळी वाऱ्याने विश्वनाथ शिरतोडेंच्या घराचे पत्रे उडून गेले होते. या दुर्घटनेत त्यांच्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता त्यास कुटुंबीयास पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले व मदतीचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी तासगाव-कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या.
तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथे झालेल्या वादळी वाऱ्याने लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेले होते. यावेळी विश्वनाथ शिरतोडेंच्या यांच्या घराचेही पत्रे उडून गेले होते. यावेळी त्यांच्या घरातील पाळण्यातील सहा महिन्यांचे बाळ उडून गेल्याने बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  

No comments:

Post a Comment

Advertise