कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात सरकार अपयशी : डॉ. रामदास आठवले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 23, 2020

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात सरकार अपयशी : डॉ. रामदास आठवले


कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात सरकार अपयशी : डॉ. रामदास आठवले 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : कोरोना वाढता प्रभाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकार वर केली आहे.

केंद्र सरकारने कोरोना या महामारीच्या आपत्तीसाठी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु राज्य सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. गेली २ महिने झाले लॉकडाऊन असल्याने अनेक गरिबांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. परंतु राज्य सरकारने याकडे डोळेझाक केली असून अजून पर्यत मदतीचे पॅकेज जाहीर करायला पाहिजे होते ते त्यांनी केले नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र राज्य सरकार ढिसाळ कारभारामुळे अपयशी ठरले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise