भाजपच्या 'या' खासदाराच्या मुलांनी केली भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 24, 2020

भाजपच्या 'या' खासदाराच्या मुलांनी केली भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण


भाजपच्या 'या' खासदाराच्या मुलांनी केली भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपच्या एका खासदाराच्या मुलांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला व त्याच्या घरातील महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे.

भाजपचा गेली १० वर्षापासून भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेला व सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेल्या कुणाल मराठे याला व त्याच्या घरातील महिलांना ही मारहाण करण्यात आली आहे. सदरची मारहाण ही भाजपचे नवनिर्वाचित खासदार भागवत कराड यांच्या मुलांनी केली असल्याचा व्हिडिओ कुणाल मराठे या भाजपच्याच कायर्कर्त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. 
सदर व्हिडिओ मध्ये पाच जण मारहाण करीत असल्याचे दिसत असून यामध्ये त्यांनी महिलांना देखील मारहाण केली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी कलाम लागू असल्याने त्याचे देखील भाजपच्या या खासदाराच्या मुलांना भान राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise