लॉकडाउन 4.0 साठी केंद्राची नियमावली जाहीर ; पहा सविस्तर काय सुरु काय बंद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 18, 2020

लॉकडाउन 4.0 साठी केंद्राची नियमावली जाहीर ; पहा सविस्तर काय सुरु काय बंद


लॉकडाउन 4.0 साठी केंद्राची नियमावली जाहीर ; पहा सविस्तर काय सुरु काय बंद 
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : केंद्र सरकारकडून लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तर कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील ही देखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे. आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त एअर अॅ्म्ब्युलन्सला परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहममंत्रालयाने नियमावलीत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हाय रिस्क असणाऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनचे कठोरपणे पालन केले जाणार आहे.

लॉकडाऊन 4.0 मध्ये या गोष्टींवर निर्बंध 
आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो सेवा, शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत, हॉटेल, रेस्टोरंट बंद राहणार, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार बंद राहणार, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावंर बंदी कायम, सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं बंद राहणार आहेत.

या गोष्टींना परवानगी
बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आतंरराज्य प्रवासाला परवानगी. यावेळी दोन्ही राज्यांनी एकमेकांची संमती घेणे आवश्यक असणार आहे, कंटेनमेंट झोनला यामधून वगळले आहे.
कंटेनमेंट, बफर, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी नियमावली. झोनप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आले आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक राज्यांनी तशी मागणी केली होती. रेड, ऑरेंज, कंटेननेंट आणि बफर झोनचे सीमांकन जिल्हा प्रशासनाकडून केले जाणार आहे. यावेळी केंद्राच्या नियमावलींची दखल घेणे गरजेचे आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी जाऊन पाहणी गरजेचे, रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.

No comments:

Post a Comment

Advertise