Type Here to Get Search Results !

जांभूळणील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९ वर


जांभूळणील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९ वर
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : जांभुळणी (ता.आटपाडी) येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदरची व्यक्ती मानखुर्द (मुंबई) येथून दि. १९ रोजी जांभुळणी येथे आली होती. त्या व्यक्तीला जांभळणी येथील शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. 

गावातील दोन व्यक्तींना कोरोना आजाराची लक्षणे जाणवल्याने दि.२२ रोजी मिरज कोविड सेंटर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह तर एकाचा कोरोना अहवाल दि.२३ रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जांभुळणी शेजारील गावांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे.
परगावाहून आलेल्या सर्वांना व्यवस्थित क्वारंटाइन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घाबरून नये. आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.
सौ. संगीता शिवराम मासाळ
सरपंच, जांभुळणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies