Type Here to Get Search Results !

अजनाळे गावात बेकायदेशीर दारूविक्री जोमात ; पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी लक्ष देण्याची गरज


अजनाळे गावात  बेकायदेशीर  दारूविक्री  जोमात ; पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी लक्ष देण्याची गरज
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : दारूसारख्या महाभयानक व्यसनाच्या आहारी जाऊन अजनाळे ता.सांगोला, जि. सोलापूर गावातील शकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत ही बाब लक्षात घेऊन अजनाळे ग्रामपंचायतीने अनेक वेळा गावात बेकायदेशीर दारू विक्रीला विरोध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. लॉकडाऊन च्या काळात अजनाळे गावात बेकायदेशीर खुलेआम दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अजनाळे गावातील बेकायदेशीर दारू विक्री बंद करावी अशी मागणी युवा नेते विष्णू देशमुख यांनी केली आहे. 
डाळींबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेले गावात ५२७८ लोकसंख्येच्या गावातील शेकडो युवक, महिला गाव दारूबंदीसाठी गेल्या अनेक वर्षापासून झगडत आहेत गावामध्ये १२५० कुटुंब संख्या असलेले अजनाळे गाव शेती व्यवसाय अग्रेसर आहे या गावातील प्रत्येक कुटुंबातील बहाद्दूर  शेतकऱ्यांनी उजाड माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलवून आपले जीवनमान उंचावले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाचे अर्थकारण मजबूत असल्याने गावातील अनेक संसार व्यसनाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त झाले आहेत. एकीकडून पोलीस कारवाईचा फार्स करीत आहेत तर दुसरीकडे अवैद्य दारू विक्रेते पोलीस कारवाईला न जुमानता दारू विक्रीचा व्यवसाय जोमाने अजनाळे गावांमध्ये सुरू आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक वेळा गावामध्ये भांडण-तंटे होत असल्याने वातावरण दूषित होत आहे. गावातील शेतकऱ्यांना डाळिंब हमखास येणाऱ्या पिकापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असल्याने हे गाव आर्थिक दृष्ट्या सधन मानले जाते. सहाजिकच उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गावामध्ये व्यसनाधीनाचे प्रमाण ही वाढू लागले आहे. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना वेळीच आळा घालून गावातील संसार उघड्यावर येण्यापासून वाचवावेत अशी अपेक्षा गावातील सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies