Type Here to Get Search Results !

गोपीचंद पडळकर यांची आमदारकीची शपथ धनगर वेशात ; शपथ घेताना वडिल कुंडलिक यांच्यानावाबरोबर आई हिराबाई चा उल्लेख


गोपीचंद पडळकर यांची आमदारकीची शपथ धनगर वेशात ; शपथ घेताना वडिल कुंडलिक यांच्यानावाबरोबर आई हिराबाई चा उल्लेख
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
मुंबई : बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेचे शपथ धनगरी वेशात घेतली. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या. यामध्ये शिवसेने कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी कडून अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, काँग्रेस कडून राजेश राठोड तर भाजपकडून गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके व रमेश कराड यांनी शपथ घेतली.
यावेळी शपथ घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे गोपीचंद पडळकर हे पारंपरिक धनगरी वेशात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या पोषाखाचा परिचय करून दिला. यावेळी ते म्हणाले डोक्यावरील फेटा हे समतेचे प्रतिक आहे. हातातील काठी ही अन्याय करणाऱ्याचा डोक्यात घालण्यासाठी आहे. खंद्यावरील खांद्यावरील घोंगडे पावसाळ्यात थंडीत व उन्हात संरक्षण करते त्याचप्रमाणे सर्व उपेक्षित व बहुजन समाजाचे सरंक्षण करायचे आहे. तयच बरोबर  सर्व बहुजन व भटक्या समाजातील वंचित असणाऱ्या बरोबरच धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies