कोरोनाने ग्रामीण भागात धाकधुक वाढली ; मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणाहून नागरिक मोठ्या प्रमाणात मूळगावी ; ग्रामस्तरीय कृती समितीने लक्ष देण्याची घरज - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

कोरोनाने ग्रामीण भागात धाकधुक वाढली ; मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणाहून नागरिक मोठ्या प्रमाणात मूळगावी ; ग्रामस्तरीय कृती समितीने लक्ष देण्याची घरज


कोरोनाने ग्रामीण भागात धाकधुक वाढली
मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणाहून नागरिक मोठ्या प्रमाणात मूळगावी ; ग्रामस्तरीय कृती समितीने लक्ष देण्याची घरज
माणदेश एक्सप्रेस न्युज
महुद/वैभव काटे : कोरोना या महामारी व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. त्यातच राज्यातील पुणे, मुंबई, सोलापुर, औरंगाबाद ,यासारख्या ठिकाणी या व्हायरसने सळो कि पळो करून सोडले आहे. शेकडो लोकांचे प्राण गेले आहे. अशा या हॉटस्पॉट ठिकाणाहून रहिवाशी असलेले लोक गावाकडे परतत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. सांगोला तालुक्यातील चिक-महूद, कटफळ, महूद या भागात मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून नागरिक मूळगावी दाखल झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी डोकेदुखी बनली आहे.
कोरोणाचा वाढता प्रभाव पाहता व शहरात कामासाठी गेलेल्या लोकांची उदरनिर्वाहाची व्यवस्था होत नसल्याने मुंबई -पुणे आदी अन्य ठिकाणाहून मजुरांचे, लोकांचे ताफे आता आपल्या जन्मभूमी कडे येत आहेत. परिणामी आता ग्रामीण भागातील ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
रेडझोन क्षेत्र म्हणून मुंबई ,पुणे अग्रस्थानी असून जास्तीत जास्त लोक उद्योग, व्यवसाय, नोकरी, मजूरी करून या भागात आपला उदरनिर्वाह करीत होते. वाटेल ते व पडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते. मात्र 22 मार्च पासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सर्व वाहने बंद झाल्याने गावाकडे जाण्याचा वाटा बंद झाल्या. मात्र आता शासनाने मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था केल्याने शहरातून मजुरांचे ताफे आता ग्रामीण भागात येत आहेत. जे लोक रेडझोन मधून आले आहेत. त्यांच्याबाबत साशंकता निर्माण होत आहे. असे लोक आपल्या गावाकडे येत आहेत.
याबाबत सर्व ग्रामपंचायतीने दक्षता बाळगून आलेल्या लोकांचे गावातील शाळेत 14 दिवसासाठी विलगीकरण त्यांच्या आरोग्य तपासणी वेळोवेळी करणेही गरजेचे आहे. बाहेरगावाहुन आलेल्या नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. नाहीतर खेडेगावात ही महामारी पसरण्याची व गावे उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शहरातून आलेले लोक सरळ घरीच जात असून ग्रामपंचायतींना जुमानत नसल्याचे बोलले जात आहे .सांगोला तालुक्यातील महुद परिसरामध्ये अनेक गावात शहरातून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे.


विलगीकरण आवश्यकग्रामीण भागामधील परिसरामध्ये मुंबई, पुणे तसेच औद्योगिक नगरातून अनेक लोक गावी येत आहेत. त्यामधील अनेकजण थेट घरी जात आहेत. परिणामी गावात कोरोना चा धोका वाढत आहे.यावर उपाय म्हणून परगावाहून येणाऱ्या प्रत्येकाचे विलगीकरण आवश्यक आहे.
ग्रामस्तरीय समितीने लक्ष देण्याची गरजस्थानिक कमिटीने आलेल्या लोकांची पडताळणी करून त्यांना क्वारंनटाइन करणे आवश्यक असुन अजून ही हातची संधी गेलेले नाही. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले व लोकांनीही प्रशासनास सहकार्य केल्यास खूप काही नुकसान होण्यापासून वाचले जाऊ शकते. अन्यथा होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नसल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise