Type Here to Get Search Results !

तडसर मध्ये जीवनावश्यक वस्तुचे वाटप ; आ. मोहनराव कदम, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या हस्ते वितरण : सुयंकांत पाटील यांचा दानशूरपणा


तडसर मध्ये जीवनावश्यक वस्तुचे वाटप 
आ. मोहनराव कदम, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या हस्ते वितरण : सुयंकांत पाटील यांचा दानशूरपणा
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी : तडसर ता.कडेगाव येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सुयंकांत पाटील यांच्याकडुन गावातील ८०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे गावात कैतुक होत आहे. यावेळी आमदार लोकनेते मोहनराव कदम (दादा), प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसिलदार डॉ.शैलजा पाटील, सहा. पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, दिग्वीजय कदम,चंद्रकांत पाटील, ऋतूराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवार हस्ते हस्ते मजुर व गरीब लोकांना वस्तुचे घरपोच वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार लोकनेते मोहनराव कदम म्हनाले की, कोरोना रोगाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेले लॉकडाऊन हे आपले सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी महत्वाचे आहे. या वैश्विक संकटाला तोंड देताना हातावर पोट असणारे, मोल मजुरी करणारे गोरगरिब लोक बिकट परिस्थितीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मूलभूत व जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत. म्हणूनच या लोकांना मदत व्हावी. यासाठी सामाजीक बांधीलकी म्हनुन सुयंकांत पाटील यांनी राबलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
सद्याची परिस्थिती अतिशय बिकट असली तरीही आपण खचून न जाता या संकटावर मात करूया. दानशुर व्यक्तीनी पुढाकार घेउन गरजु लोकांना सुर्यकांत पाटील यांच्यासारखी मदत करावी. पाटील परीवारासारखे उपक्रम गावा गावात होणे आवश्यक असल्याचे मत प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसिलदार डॉ.शैलजा पाटील यांनी व्यक्त करत पाटील परीवाराचे आभार मानले.
यावेळी संग्राम पाटील, सुरज पवार,  धैर्यशील देशमुख, आबा शेळके, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. सर्व नियमांचे पालन करुन घरोघरी किटचे तरुणांनी वाटप केले.

तालुक्यात ४०० फेस शिल्डचे होणार वाटपजीवनावश्यक वस्तूंचे ८०० किटचे गोरगरीब व गरजूंना वितरण करण्यासाठी सत्य साई  ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले. तसेच तालुक्यातील कोरोना युध्दात काम करणारे आरोग्य विभाग, पोलीस, महसुल अधिकारी, कडेगाव नगरपंचायत, पंचायत समिती यांना मोफत ४०० फेस शिल्डचे करणार आहे.सुर्यकांत पाटील 
Join Free WhatsApp माणदेश एक्सप्रेस  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies